‘ट्विटर’ला धडा शिकवायला निघालेला ‘कू’चा कूकू करणारा पिवळा पक्षी लुप्त झालाय….
‘आत्मनिर्भर भारता’च्या गवगव्यात अवतीर्ण झालेल्या आणि ‘ट्विटर’ला देशी पर्याय म्हणून डंका पिटला गेलेल्या ‘कू’ (KOO) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निव्वळ कुरकुर सध्या सुरू आहे, असे म्हणणे फारसे वावगे ठरणार नाही. या ‘कू’चा इतिहास जेवढा रंजक, तेवढाच राजकीयसुद्धा आहे. त्या अर्थाने एका फसत चाललेल्या राजकीय प्रयोगाची ही एक रंजक ‘कू’वार्ताच आहे.......